कथा-साहित्यप्रकार-परिचय | Katha Sahityaprakar parichay | इयत्ता 12 मराठी

कथा-साहित्यप्रकार-परिचय | Katha Sahityaprakar parichay | इयत्ता 12 मराठी. Get comprehensive Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions for Bhag 3, ‘कथा-साहित्यप्रकार-परिचय’. Access detailed question answers, swadhyay solutions, and textbook exercise notes for your 12th std Marathi guide.

कथा-साहित्यप्रकार-परिचय 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers

कृती

1. कृती करा.

प्रश्न अ. करेचे घटक

1) कथेचे घटक

कथेचे घटक

उत्तर :

(१) कथाबीज

(२) कथानक

(३) पात्रचित्रण

(४) नाट्यमयता

(५) भाषाशैली

1) कथेचे घटक

उत्तर :

(१) कथाबीज

(२) कथानक

(३) पात्रचित्रण

(४) नाट्यमयता

(५) भाषाशैली

2) कथेची वैशिष्ट्ये

2) कथेची वैशिष्ट्ये

उत्तर :

(१) कथा मनोरंजन करते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात.

(३) वाचकांची उत्कंठा वाढते.

(४) कथा एककेंद्री असते.

(५) कथा श्रवणीय असते.

2) कथेची वैशिष्ट्ये

उत्तर :

(१) कथा मनोरंजन करते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात.

(३) वाचकांची उत्कंठा वाढते.

(४) कथा एककेंद्री असते.

(५) कथा श्रवणीय असते.

2. उत्तरे लिहा.

प्रश्न अ. कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर :
कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरणही असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते.

प्रश्न आ. कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :
(१) कथाबीज : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो. ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय. ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा, आपण आत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय. हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय.

उदा., पुढील कथाबीज पाहा : “हा आपलाच मुलगा आहे’, असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या दोन स्त्रियांचे भांडण न्यायाधीशांकडे जाते. आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात.

(२) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत. वास्तवातील माणसांसारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो. या व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचे विचार, कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच रंगवतो. त्यांचे राग, लोभ, प्रेम, द्वेष, हेवेदावे वास्तवातील माणसांसारखेच रंगवलेले असते. वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वाटतात. त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात. पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो.

प्रश्न इ. कथेची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर :
(१) कथा मनोरंजन करते : कथा मनोरंजन करते म्हणजे कथा वाचताना वाचकाला आनंद मिळतो. त्याचे मन कथेत गुंतून राहते. वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. त्याला नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते. वास्तवातील ताणतणावांपासून तो काही काळ दूर जातो. या घटनेतून त्याला आनंद मिळतो. कथेमार्फत वाचकाला ५ मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते. याचा त्याला आनंदच होतो. काही कथा तर विनोदनिर्मितीसाठीच लिहिल्या जातात. त्या कथांमुळे वाचक खळखळून हसतो. या सर्व बाबींमुळे वाचकाचे मनोरंजनच होते. कथेचे ते एक मोठे वैशिष्ट्य ठरते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून, चांगल्या-वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. या संघर्ष-दर्शनाने वाचकाला प्रेरणा मिळते; . स्फूर्ती मिळते. वाचक त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकाच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वत:च्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिग्दर्शन होते. हे सुसंस्कारच होत.

प्रश्न ई. ‘कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर :
कथाकथनासाठी कथा निवडताना श्रोते कोणत्या वर्गातील आहेत, हे प्रथम लक्षात घ्यावे लागते. ग्रामीण, शहरी, शिक्षित, अशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील की सर्वसाधारण वर्गातील, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, कारखान्यातील कामगार, मंत्रालयातील कर्मचारी, महाविदयालयीन अशांपैकी कोणत्या वर्गातील श्रोते बहुसंख्येने असतील, हे आधी पाहावे लागते, कारण या प्रत्येक वर्गातील श्रोत्यांच्या जीवनविषयक धारणा वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अभिरुचीचा स्तर वेगवेगळा असतो. तसेच, कथाकथनाचा कालावधी किती, हाही मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. श्रोत्यांच्या अवधानकाळाचेही भान बाळगावे लागते. एवढे पाहिल्यावर कथा कोणत्या प्रकारची, तिची लांबी किती हेही ठरवावे लागते. या सर्व कसोट्यांना उतरणारी कथा निवडावी लागते. ही निवड जबाबदारीने केली नाही, तर कथाकथनाचा कार्यक्रम साफ कोसळण्याचा धोका असतो.

प्रश्न उ. कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.

कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.

उत्तर :

(१) भाषासौंदर्य

(२) आशय सौंदर्य

(३) अभिव्यक्ती विशेष

(४) सादरीकरण शक्य

(५) मनोरंजन व बोध

प्रश्न उ. कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.

उत्तर :

(१) भाषासौंदर्य

(२) आशय सौंदर्य

(३) अभिव्यक्ती विशेष

(४) सादरीकरण शक्य

(५) मनोरंजन व बोध

प्रश्न ऊ. कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.

प्रश्न ऊ. कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.

उत्तर :

(१) विविध लेखकलेखिकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता

(२) भाषेची जाण

(३) शब्दोच्चार

(४) प्रकट वाचन करण्याची क्षमता

प्रश्न ऊ. कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.

उत्तर :

(१) विविध लेखकलेखिकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता

(२) भाषेची जाण

(३) शब्दोच्चार

(४) प्रकट वाचन करण्याची क्षमता

3. कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर :
कथा पूर्ण झाल्यावर एक अवघड कामगिरी लेखकाला पार पाडावी लागते. ती म्हणजे कथेचे शीर्षक निश्चित करणे. शीर्षक निश्चित करणे हे खूप जिकिरीचे काम असते. कारण शीर्षकाकडून खूप अपेक्षा सर्वांच्या मनात असतात. शीर्षक हे कथेचा चेहेरा असते. चेहेऱ्यावरून जशी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खूण पटते, तशी शीर्षकावरून कथेच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटत असते.

शीर्षक आकर्षक हवे, त्यासाठी आकर्षक शब्दयोजना करण्याचा प्रयत्न लेखकाकडून होतो. मग एखादी लोकप्रिय म्हण, वाक्प्रचार, सुप्रसिद्ध लोकोक्ती, प्रचलित प्रभावी शब्दप्रयोग यांचा विचार केला जातो. या घटकांमुळे वाचकांचे कथेकडे लक्ष आकर्षिक व्हायला हवे. शीर्षकाने वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण केले पाहिजे. हे सर्व आवश्यक असते. तरीही हा बराचसा बाह्य भाग झाला. शीर्षकातून कथेतील मूल्यांचा संघर्ष, नैतिक संघर्ष यांचे सूचन झाले पाहिजे. कथेचे सारच जर शीर्षकातून व्यक्त करता आले, तर ते फारच उत्तम. शीर्षक ही आकाराने खूप लहानशी गोष्ट आहे. पण ती खूप वेळ व शक्ती खर्च करायला लावणारी मोठी बाब आहे.

4. ‘कथा आजही लोकप्रिय आहे’, या विधानाबाबतचे तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :
कथावाङ्मय हे आजही लोकप्रिय आहे. मनोरंजन करणे आणि उद्बोधन करणे या दोन कारणांसाठी कथावाङ्मय खूप वापरले गेले आहे. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे हे दोन पिढ्यांमागचे लेखक आजही लोकप्रिय आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक कारणांनी समाजात प्रचंड उलथापालथी चालू आहेत, या उलथापालथीमध्ये आपापल्या मतांचा प्रचार करण्यासाठी, लोकांचे मन वळवण्यासाठी समाजमाध्यमांवर कथांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. हे कथावाङ्मयाच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे.

सध्याचा काळ हा खूप धावता काळ आहे. लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी कमी वेळात कथाच प्रभावीपणे सादर होऊ शकली आहे. दुसरे असे की मराठी कथेने आता विविध विषयांना स्वीकारले आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब मराठी कथेत पडू लागले आहे. म्हणून कथा लोकप्रिय झाली आहे.

5. प्रभावी कथाकथनासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?

उत्तर :
कथाकथन करणाऱ्याने प्रथम श्रोत्यांचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. श्रोत्यांच्या स्वरूपानुसार कथेची निवड करावी लागते. कथाकथनाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधानकाल या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. श्रोत्यांशी संवाद साधत साधत आणि त्यांचा प्रतिसाद घेत घेत कथाकथन करायचे असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, उच्चारांतील चढ-उतार, स्पष्टता इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कथाकथन करणाऱ्यांकडे वाचिक अभिनयाचे कौशल्य असावेच लागते. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. कथाकथन करताना हातात लिखित मजकूर नसतो; त्यामुळे पाठांतर उत्तम असावेच लागते. या सर्व बाबींची काळजी कथाकथन करणाऱ्याने घेतली पाहिजे,

6. तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा.

कथा-साहित्यप्रकार-परिचय प्रस्तावना

कथा म्हणजे गोष्ट, कहाणी, हकिगत, प्रसंग इत्यादी. गोष्ट सांगण्याची व ऐकण्याची आवड माणसाला पूर्वीपासूनच आहे. ‘कथ् ‘ या धातूपासून ‘कथा’ हा शब्द तयार झाला आहे. कथ् म्हणजे कथन करणे, सांगणे, वर्णन करणे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे आपल्या कल्पना, भावना, आपले विचार, आपले अनुभव इतरांना सांगावेत व इतरांचे आपण ऐकावेत, अशी त्याला तीव्र इच्छा असते. त्यातूनच ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराचा जन्म झाला.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथा म्हणजे काय?

कथेत घटना-प्रसंग असतात. पात्रे असतात. घटना-प्रसंग असल्याने स्थळ, काळ, वेळ या बाबी असणारच, या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी कथानक असते. कथेमध्ये या सर्व बाबी आवश्यक असतात. कथेतील पात्रांचे एकमेकांशी बरेवाईट संबंध असतात. त्यांतून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. पात्रांतले ताणतणाव, संघर्ष वाढले की, उत्कर्षबिंदू निर्माण होतो. हे सर्व घटक कथेचे अंगभूत घटक असतात. तसेच, कथेला एक शीर्षकही असते.

कथेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल :

“एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय.’

कथेचे वर सांगितलेले अंगभूत घटक सर्व कथांमध्ये सारख्याच प्रमाणात असतात असे नाही. लेखकाच्या हेतूनुसार ठरावीक घटकांना जास्त महत्त्व मिळते.

Leave a Comment